शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा चिंचवड येथे सुरू; नितीन काळजे यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:14 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित ‘महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेचे’ उद्घाटन नितीन काळजे यांच्या हस्ते चिंचवडगाव येथे झाले.

ठळक मुद्देया स्पर्धेत सहभागी होणार सुमारे १७० खेळाडू स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन महापालिकेचा लौकिक वाढवावा : नितीन काळजे

पिंपरी : जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार झाले पाहिजेत. यासाठी महापालिका विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धा भरवत असते. तसेच महानगरपालिका विकासाबरोबरच खेळाला नेहमी प्राधान्य देत असते, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित ‘महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेचे’ उद्घाटन नितीन काळजे यांच्या हस्ते चिंचवडगाव येथे झाले. मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.    कार्यक्रमास नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य सुरेश भोईर, मोरेश्वर शेंडगे, सहायक आयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, अशोक पटेकर, जयश्री भोज, अनिता पालवे, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटना सचिव प्रमोद चोळकर, पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव सुधीर माळसकर, वेटलिफ्टिंगचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल दुबे, सजना पांडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे, विजय पाटील, अश्विनी पाटील, तुकाराम गायकवाड, श्री पाटोळे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी उपस्थित होते.खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच जागतिक पातळीचे खेळाडू तयार होण्यासाठी महापालिका सातत्याने असे उपक्रम राबवित असते. खेळाडूंनी मोठ्या संख्येने अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन महापालिकेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन नितीन काळजे यांनी केले. माजी महापौर विलास विठोबा लांडे आयोजित या स्पर्धेत सुमारे १७० खेळाडू सहभागी होणार असून, स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिसे व ट्रॉफी, मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत.या वेळी वेटलिफ्टिंगचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल दुबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी आभार मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड