22 वर्षानंतर महिला वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले गोल्ड मेडल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 04:57 PM2017-11-30T16:57:00+5:302017-11-30T17:01:06+5:30

वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत साईखोम मीराबाई चानूने 194 किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम रचला आहे.

अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर आहे. 22 वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारताकडून पहिली वर्ल्ड चॅम्पियन बनली होती.

48 किलो वजनी गटात पहिल्यांदा 85 किलो आणि दुस-यांना 109 किलो वजन उचलून चानूने सुवर्णपदकावर नाव कोरले.

पोडियमवर पदक स्विकारण्यासाठी उभं राहिल्यानंतर भारताचा तिरंगा पाहून चानूच्या डोळयात अश्रू तरळले.