शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘शास्ती’च्या नावाखाली लूट, मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:17 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्कम मिळणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्कम मिळणार आहे. भाजपाने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता शास्तीकर माफ होऊ शकला नाही. महापालिकेने नागरिकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लावून नोटीस दिल्या आहेत. शास्तीकर भरला नाही, तर मिळकती जप्त करण्यात येतील, अशीही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरू केला आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या या मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. शहरातील अनेक नागरिकांनी रविवारी खासदार बारणे यांची भेट घेतली. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याची विनंती केली; परंतु शासनाने शास्तीकर माफ केलाच नाही. उलट नागरिकांना चक्रवाढ व्याज लावून अधिक मनस्ताप दिला आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जी नियमावली बनवली ती अधिक जाचक असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंडाची प्रक्रिया असल्याने नागरिक अनधिकृत मिळकती अधिकृत करण्यासाठी अर्ज करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शास्तीकराचा दंड व व्याजाची रक्कम नागरिकांना परवडणारी नसल्याने जोपर्यंत पूर्णत: शास्तीकर पूर्वलक्ष्यी माफ होत नाही, तोपर्यंत कोणीही शास्तीकराची रक्कम भरू नये; शास्तीकर व त्याच्या चक्रवाढ व्याजाचा विरोध करावा.’’सत्ताधाºयांनी आश्वासनाची पूर्तता करावी-खासदार बारणे म्हणाले, ‘‘शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला सावकारी धंदा बंद करावा. महापालिका निवडणुकीत शहरवासीयांना शास्तीकर माफीच्या दिलेल्या आश्वासनाची सत्ताधाºयांनी पूर्ती करावी. शहरातील नागरिकांनी शास्तीकर, तसेच त्यावर आकारण्यात येणारे व्याज भरू नये. भाजपाने दिलेल्या शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या घरासमोर धरणे आंदोलन करावे. जेणेकरून त्यांनाही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण होईल. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर भाजपाला आश्वासनांचा विसर पडत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड