शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस यंत्रणेमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत समन्वयाचे 'विघ्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 11:10 IST

पोलिसांकडून कारवाईचा इशारा तर महापालिकेकडून स्वागताची तयारी

ठळक मुद्देघाटांच्या सज्जतेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम :

नारायण बडगुजर

पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवा दरम्यान आगमन तसेच विसर्जन मिरणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नदीवरील घाटांवर गणेश मूर्तीच्या विसर्जनाला देखील मनाईचा आदेश आहे. असे असतानाही शहरातील घाटांची स्वच्छता तसेच डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य संभ्रमावस्थेत आहेत. एकीकडे कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात येत असतानाच प्रशासन घाटांची सज्जता करीत आहे. समन्वयाअभावी महापालिका प्रशासनाचा असा गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच शासनाने उत्सवाबाबत मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. आचारसंहिता म्हणून गणेशोत्सव मंडळांनी त्यानुसार उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळांनी मंडपाजवळ कृत्रीम हौद तयार करून किंवा टबमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. तसेच घरगुती गणपतीचे घरातच विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. हौसिंग सोसायट्यांनी देखील अशाच पद्धतीने सोसायटीतच मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी गणेश मंडळांना याबाबत सूचना केल्या आहेत. शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील केले आहे. मिरवणूक काढता येणार नाही, तसेच विसर्जनासाठी घाटांवर कोणत्याही प्रकारची तयारी केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

घाटांवर करणार बॅरिकेडींग

शहरात पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या घाटांवर गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. दरवर्षी या घाटांची डागडुजी व दुरुस्ती करून स्वच्छता केली जाते. तसेच महापालिकेकडून कृत्रीम हौद तसेच इतर सुविधा देखील या घाटांवर उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र गणेश मूर्तींचे विसर्जन घाटांवर करण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदा या घाटांवर बॅरिकेडींग केली जाणार आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. 

महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाकडे प्रशासनातील काही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. घाटांवर गणेश मूर्ती विसर्जनास मनाई असल्याची सूचना आयुक्त हर्डीकर यांनी केली. तरी देखील आरोग्य विभागाकडून घाटांवर सज्जता करण्यात येत आहे.  

घाटांवर मूर्ती विसर्जनास शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे घाटावर मूर्ती विसर्जनासाठी येणाºया नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशा पद्धतीने पावित्र्य राखून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. - संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी घाटांवर कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी घाटांवर येऊ नये. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही बंधने गणेशोत्सवात पाळायची आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.- श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड  

सार्वजनिक मंडळे, हौसिंग सोसायटी, घरगुती तसेच इतर सर्वप्रकारच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास घाटांवर मनाई आहे. मात्र असे असले तरी घाटांची साफसफाई करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने घाटांवर कामकाज केले जात आहे. - डॉ. अनिल रॉय, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Mahotsavगणेशोत्सवshravan hardikarश्रावण हर्डिकरPoliceपोलिस