मुख्यमंत्र्यांची सभा रद्दची चर्चा

By Admin | Updated: February 15, 2017 02:17 IST2017-02-15T02:17:18+5:302017-02-15T02:17:18+5:30

पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चिंचवडनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा १४ फेब्रुवारीला भोसरी येथे नियोजित होती.

Discussion of cancellation of CM's meeting | मुख्यमंत्र्यांची सभा रद्दची चर्चा

मुख्यमंत्र्यांची सभा रद्दची चर्चा

पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चिंचवडनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा १४ फेब्रुवारीला भोसरी येथे नियोजित होती. मात्र, शहर भाजपांतर्गत गटबाजीमुळे सभा रद्द झाल्याची चर्चा आहे.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारमधील नेत्यांना प्रचाराला आपल्या विधानसभा मतदारसंघात आणण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी प्रयत्न केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ चिंचवडमध्येच सभा घेतली. त्याचा फायदा जगताप समर्थकांना होऊ शकतो. अशीच सभा भोसरीमध्ये घेण्यास मात्र, पक्षांतर्गत काही नेत्यांचा विरोध असल्याने नियोजित सभा रद्द झाल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion of cancellation of CM's meeting