पेट्रोल पंप बंदमुळे वाहनचालकांची गैरसोय

By Admin | Updated: August 12, 2014 03:52 IST2014-08-12T03:52:16+5:302014-08-12T03:52:16+5:30

शहरातील पेट्रोल पंप सोमवारी दिवसभर बंद असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. इंधन संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचे चित्र शहरात दिसले

Disadvantages of driving due to petrol pump shutdown | पेट्रोल पंप बंदमुळे वाहनचालकांची गैरसोय

पेट्रोल पंप बंदमुळे वाहनचालकांची गैरसोय

पिंपरी : शहरातील पेट्रोल पंप सोमवारी दिवसभर बंद असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. इंधन संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचे चित्र शहरात दिसले. सायंकाळनंतर काही पंप खुले झाल्याने इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर शासनाने अतिरिक्त कर लावल्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल ४ ते ५ रुपयांनी महाग आहे. त्याचा दुष्परिणाम ग्राहकांवर होतो. अतिरिक्त कर रद्द करण्यात यावा, या मागणीकरिता राज्यभरासह शहरातीलही पंप मालकांनी सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता.
शहरातील सर्वच पंप रविवारी रात्री बारापासून बंद करण्यात आले होते. सोमवारी दिवसभर पंप बंद ठेवण्यात आले होते. पंप बंद असल्याचे फलक लावण्यात आले होते. मात्र, पंपांवर कर्मचारी उपस्थित होते. पंप बंद असल्याने वाहनचालकांना इंधन भरता आले नाही. पंपांवर येऊनही इंधन न मिळत नसल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. इंधन संपल्याने अनेक दुचाकी वाहने रस्त्यावरून ढकलत नेत असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसले. काहींनी पीएमपी व रिक्षा या सार्वजनिक प्रवासी सेवेचा वापर केला. शंकरवाडी, कासारवाडी, यशवंतनगर, भोसरी येथील पंप सुरू असल्याचे समजताच या ठिकाणी इंधन भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली होती. या पंपांवर दिवसभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सहानंतर सर्वच पंपांवर इंधन विक्री सुरू केली गेली. नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत इंधन भरून घेतले. यामुळे सर्वच पंपांवर रांगा लागल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Disadvantages of driving due to petrol pump shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.