नळजोड तोडल्याने नागरिकांची गैरसोय

By Admin | Updated: February 28, 2016 03:46 IST2016-02-28T03:46:18+5:302016-02-28T03:46:18+5:30

औंध रस्ता, खडकी येथील सूर्या पाटील कॉम्प्लेक्स या हौसींग सोसायटीतील ७ दुकानदारांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातील नळजोड बंद केल्याने दुकानदार

Disadvantages of citizens due to breakdown of turbidity | नळजोड तोडल्याने नागरिकांची गैरसोय

नळजोड तोडल्याने नागरिकांची गैरसोय

पिंपरी : औंध रस्ता, खडकी येथील सूर्या पाटील कॉम्प्लेक्स या हौसींग सोसायटीतील ७ दुकानदारांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातील नळजोड बंद केल्याने दुकानदार व महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. हा प्रकार होऊन दीड महिना उलटूनही पाणी पुरवठा विभाग, उपनिबंधक कार्यालय, पोलीस, पुणे महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही.
या संदर्भात तक्रारी करुनही अद्याप दखल घेतली गेली नाही, असे शिला थॉमस,शाजी थॉमस, मुन्ना शेख, विवेक कांबळे, हेमंत पटेकर, प्रिती पटेकर, इमामुद्दीन खान या दुकानदारांनी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना चर्चेसाठी बोलावून योग्य तोडगा काढण्याचे सुचना दिल्या आहेत. या संदर्भात जॉन इलियास यांनी सांगितले,‘‘सध्या पाणी
टंचाई आहे. दुकानदारमंडळी
पाण्याचा अपव्यय करतात.
त्यामुळे टाकीत पाणी शिल्लक राहत नाही. पाणीपुरवठा विभागाच्या परवानगीने नळजोड बंद केला
आहे.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Disadvantages of citizens due to breakdown of turbidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.