वीज गेल्याने नागरिकांची गैरसोय
By Admin | Updated: October 30, 2015 00:20 IST2015-10-30T00:20:47+5:302015-10-30T00:20:47+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गुरुवारी सकाळी विविध शुल्क भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती

वीज गेल्याने नागरिकांची गैरसोय
पिंपरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गुरुवारी सकाळी विविध शुल्क भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. वीजपुरवठा खंडित झाल्याने शुल्क भरण्याच्या कामासाठी, तसेच शिकाऊ परवाना काढण्यासाठी आलेले नागरिक संतप्त झाले होते.
कंपन्यांना गुरुवारी सुटी असल्याने या दिवशी आरटीओत गर्दी असते. शासनाकडून आरटीओला जनरेटर मिळाले आहे. परंतु त्यात डिझेल कोणी भरायचे, या वादात तब्बल दोन तास नागरिकांना खोळंबून राहावे लागले. दोन तास झाले आम्ही रांगेत उभे आहोत, आरटीओचे इतके उत्पन्न आहे, मग जनरेटरची व्यवस्था करू शकत नाही का, असा सवाल उपस्थित केला. (प्रतिनिधी)