शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कलम १५५ चे आदेश संशयास्पद असल्यास थेट कारवाई, जमाबंदी आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:06 IST

- भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या सात-बारा उताऱ्यांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ सात-बारा आणि हस्तलिखित सात-बारा यात अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले होते.

पुणे : सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर हस्तलिखित उताऱ्यातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या कलम १५५ नुसार आदेश देऊन कमी करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात संशयास्पद व्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात असे आदेश तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आता भूमी अभिलेख विभागाने १५५ कलमानुसार राज्यात देण्यात आलेले यापूर्वीच्या सर्व आदेशांची पडताळणी करण्याचे ठरविले आहे. यात नियमबाह्य आदेश असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे. या आदेशामुळे अनेकांचे धाबे दणाणणार असल्याची चर्चा आहे.भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या सात-बारा उताऱ्यांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ सात-बारा आणि हस्तलिखित सात-बारा यात अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले होते. त्यानुसार पुणे विभागातील असे सात-बारा उतारा तपासण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यात विभागातील ५० हजार ४३२ सात-बारा उताऱ्यांपैकी ४४ हजार ९४१ हस्तलिखित सात-बारा उताऱ्यांमध्ये चुका आढळल्या. सर्वाधिक चुका पुणे जिल्ह्यात आढळल्या आहेत. दुरुस्त केलेला हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.याबाबत दिवसे म्हणाले, “यापूर्वी कलम १५५ नुसार झालेल्या आदेशांची तपासणी करणार आहोत. अशा प्रकारचे काही संशयास्पद आदेश असल्यास त्यांची नोंद घेतली जाणार आहे. अशा संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कारवाईचे अधिकार आहेत. त्यांना तशी करवाई करण्याचे निर्देश दिले जातील. तसेच यापुढे १५५ कलमानुसार होणाऱ्या सर्व आदेशांची नोंद ऑनलाईन ठेवली जाणार आहे. त्याची ठराविक अंतराने पडताळणी केली जाईल. हे आदेश कुणी दिले, कसे दिले याची संपूर्ण नोंद यापुढे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीच्या आदेशांना आळा बसेल.”पुणे विभागात झाली होती तपासणीसात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर हस्तलिखित उताऱ्यातील नावे व क्षेत्र चुकविणे, नवीन शर्तीचे शेरे, कूळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारीपड बाबतचे शेरे, वारसांच्या नोंदी वैध व कायदशीर नोंदी कलम १५५ नुसार आदेश देऊन कमी करण्यात आल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केल्या. त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य सरकारने तत्कालिन पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांना गेल्या १० वर्षांतील अशा सातबारा उताऱ्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते. जुना हस्तलिखित सात-बारा आणि संगणकीकृत केलेला सातबारा हा एकसारखा तपशील असलेला (मिरर इमेज) असावा, याची खातरजमा करण्याचे आदेश राव यांनी दिले होते. त्यानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. विभागातील पाच जिल्ह्यांमधून सुमारे ५० हजार ४३२ सातबारा उताऱ्यांसंबंधी आदेश देण्यात आले होते. आयुक्तालयाने याचा एकत्रित अहवाल राज्य सरकारला पाठविला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे