सुनियोजित विकास करू

By Admin | Updated: February 16, 2017 03:07 IST2017-02-16T03:07:59+5:302017-02-16T03:07:59+5:30

नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभागाचा सुनियोजित विकास करू, यासाठी नागरिकांचा विशेषत: युवा, महिला आणि कामगार वर्गाच्या सूचनांचा विचार करून सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रभाग

Develop well planned | सुनियोजित विकास करू

सुनियोजित विकास करू

चऱ्होली : नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभागाचा सुनियोजित विकास करू, यासाठी नागरिकांचा विशेषत: युवा, महिला आणि कामगार वर्गाच्या सूचनांचा विचार करून सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रभाग म्हणून शहरात ओळख निर्माण करू, असे आश्वासन प्रभाग क्रमांक तीनच्या भाजपाच्या उमेदवारांनी कोपरा सभेदरम्यान नागरिकांना दिले.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार नितीनअप्पा काळजे, सुवर्णा बुर्डे, लक्ष्मण सस्ते यांनी प्रभागामध्ये कोपरा सभा, पदयात्रांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरु आहेत. प्रभागामध्ये आजच्या आवश्यक गरजांना प्राधान्य देऊन त्या पूर्ण करण्यासाठी भाजपाचे उमेदवार बांधिल राहतील, महिलांची सुरक्षा, प्रभागातील मुलांना चांगले शिक्षण, सदृढ आरोग्य, बेरोजगारांना रोजगार, महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उमेदवारांनी दिले. (वार्ताहर)

Web Title: Develop well planned