‘भुशी’वर पर्यटकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:04 AM2018-07-23T01:04:31+5:302018-07-23T01:04:53+5:30

पाण्याचा वेग जास्त असल्याने या पाय-यांवर बसण्यास पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

Destruction of tourists on Bhushi | ‘भुशी’वर पर्यटकांचा हिरमोड

‘भुशी’वर पर्यटकांचा हिरमोड

Next

लोणावळा : लोणावळा परिसरात मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्याचा वेग जास्त असल्याने या पायºयांवर बसण्यास पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
लोणावळा परिसरात ३ जुलैच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून, पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम असल्याने धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी हे वेगात वाहत असल्याने पर्यटकांना धरणाच्या पायºयांवर मधोमध जाऊन बसणे शक्य होत नसल्याने पर्यटक पायºयांच्या कडेने उभे रहात भुशी धरणाचा सेल्फी काढण्याचा आनंद घेत आहेत. मागील तीनही रविवार भुशी धरणावर अशीच स्थिती असल्याने पर्यटकांची व पर्यायाने स्थानिक व्यावसायिकांची देखील निराशा होऊ लागली आहे. भुशी धरणाच्या पायºयांवर जाऊन बसणे शक्य नसले तरी धरणाचे पाणी व पायºयांवरून वाहणारे पाणी पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी पहायला मिळत होती. लायन्स पॉइंट परिसर पर्यटकांनी गजबजला होता. यासह लोहगड किल्ला व भाजे धबधबा येथे देखील पर्यटकांची
मोठी गर्दी झाली होती. लोणावळा मार्गे पवनानगरकडे जाणाºया पर्यटकांना लोणावळा पवनानगर रस्त्यावरील खड्डयांचा मनस्ताप
सहन करावा लागला. शनिवार व रविवार दोन्ही दिवस पर्यटक वाहनांच्या गर्दीने लोणावळा शहरात वाहतूककोंडी झाली होती. पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग देखील वाहतूककोंडी झाली होती.

Web Title: Destruction of tourists on Bhushi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.