गतिशील विकासाचा ध्यास: दत्तात्रय साने

By Admin | Updated: February 14, 2017 02:04 IST2017-02-14T02:04:14+5:302017-02-14T02:04:14+5:30

चिखली गावठाण प्र्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय साने, सोनम मोरे, स्वाती साने आणि पक्षाने

Dental Development: Dattatray Sane | गतिशील विकासाचा ध्यास: दत्तात्रय साने

गतिशील विकासाचा ध्यास: दत्तात्रय साने

पिंपरी : चिखली गावठाण प्र्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय साने, सोनम मोरे, स्वाती साने आणि पक्षाने पुरस्कृत केलेले सतीश ऊर्फ बाळू दिघे यांच्या प्रचारफेरीस मोठा प्रतिसाद मिळाला. ‘‘आतापर्यंत अनेक विकास कामे केली. गतिशील विकासाचा मानस असून सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा मनोदय आहे, असे आवाहन दत्तात्रय साने यांनी केले.
गणेश मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांनी रामदासनगर, गणेशनगर भागातील मतदारांशी संपर्क साधला. चिखली गावठाण, तळवडे, एमआयडीसी, आयटी पार्क,शेलारवस्ती, पाटीलनगर, गणेशनगर, सोनवणे वस्ती, जोतिबानगर परिसरात त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली. या संधीचे सोने करणार असल्याचे या वेळी उमेदवारांनी सांगितले. नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. उमेदवार साने म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करून आपल्या परिसराचा विकास करण्याची संधी द्यावी, परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असून, हा प्रभाग आगामी काळात इतरांसाठी आदर्शदायी ठरेल. अशा पद्धतीने काम करणार आहे. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यापासून ते या भागात पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.’’
या वेळी परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. या परिसरातील संस्था,संघटना, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, तसेच ग्रामस्थांनी पॅनेलमधील उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केला.(प्रतिनिधी)

Web Title: Dental Development: Dattatray Sane