डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू, डास प्रतिबंधक फवारणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:54 PM2018-11-10T22:54:52+5:302018-11-10T22:54:55+5:30

ओतूर शहर परिसरात नागरिक सर्दी, हिवताप, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

Dengue causes death of one, demanding mosquito resistant spraying | डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू, डास प्रतिबंधक फवारणीची मागणी

डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू, डास प्रतिबंधक फवारणीची मागणी

Next

ओतूर : परिसरात विविध तापाची साथ आल्याने सर्व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी गर्दी होते आहे. ओतूर शहरात डेंग्यूसदृश आजाराने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विनायक खोल्लम असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

ओतूर शहर परिसरात नागरिक सर्दी, हिवताप, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. काही ठिकाणी जुलाब, उलट्या, तसेच न्यूमोनियाच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. तालुका वैद्यकीय प्रशासनाने तालुक्यात स्वच्छता मोहीम राबववावी, अशी नागरिकांची मागणी आहे. विनायक खोल्लम गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. वाढते आजार लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून ओतूर ग्रामपंचायतीने डासप्रतिबंधक औषधांची फवारणी केली आहे, असे सरपंच बाळासाहेब घुले म्हणाले. याबाबत जुन्नरचे वैद्यकीय अधिकारी उमेश गोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आठड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.

या विभागात यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी कचरा साठला आहे. तालुका वैद्यकीय प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवून डासप्रतिबंधक फवारणी करावी. आठवड्यात एक दिवस कोरडा पाळावा, अशा सूचना ग्रामपंचायतीने दिल्या.

Web Title: Dengue causes death of one, demanding mosquito resistant spraying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.