शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आत्मदहनाचा इशारा देणारे आंदोलक पोलिसांच्या देखरेखेखाली : आंदोलकांचा अन्नत्याग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 13:56 IST

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनात आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणी करीता रात्रीपासून आंदोलनाला बसले आहेत.

ठळक मुद्देआमच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीआत्मबलिदान करण्याचा इशारा दिलेल्या मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न

रावेत : पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उड्या घेत आत्मबलिदान करण्याचा इशारा दिलेल्या मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न फसल्याने वाकड पोलिसानी गुरुवारी रात्री ११ वाजता शहरा बाहेर जाऊन भूमिगत होण्याच्या तयारीत असताना ९ आंदोलकांना रहाटणी येथून ताब्यात घेऊन देखरेखीखाली ठेवले आहे.पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून इशारा देणाऱ्या समन्वयकाना ताब्यात घेतले. सतीश काळे यांच्यासह छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व मोर्चाचे समन्वयक धनाजी येळकर-पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर पाटील, वैभव जाधव, अमोल मानकर, भैय्यासाहेब गजधने, ज्ञानदेव लोभे, राजू पवार, आणि अंतिम जाधव अशी सामूहिक आत्मबलिदानाचा इशारा देणाऱ्या आंदोलक तरुणांची नावे आहेत. सर्वांनी मागण्या मान्य होईपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये अन्नत्याग करण्यासाठी रात्री पासून बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनासाठी आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणी करीता शनिवार (दि ४) रोजी सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा मोचार्चे पिंपरी-चिंचवड समन्वयक सतीश काळे व त्यांच्या नऊ दिलेला होता. आमच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.तत्पूर्वी त्यांनी ते पुणे जिल्हाधिकारी नवलराम आणि पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनाही दिले आहे. ते मिळताच जिल्हा प्रशासन व पोलिसांनी आरक्षणाचा निर्णय अपेक्षित असल्याने हे पाऊल उचलू नका असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरक्षणाला काही महिने लागणार असल्याचे लक्षात येताच हे तरुण आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. 

टॅग्स :ravetरावेतmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस