चिंचोलीतील चर बुजविण्याची मागणी
By Admin | Updated: June 25, 2016 00:22 IST2016-06-25T00:22:15+5:302016-06-25T00:22:15+5:30
संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असून, चिंचोली येथील शनी मंदिर येथे विसावा असून, त्या ठिकाणी खोदण्यात आलेले लांबलचक

चिंचोलीतील चर बुजविण्याची मागणी
देहूरोड : संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असून, चिंचोली येथील शनी मंदिर येथे विसावा असून, त्या ठिकाणी खोदण्यात आलेले लांबलचक चर बुजवून टाकावेत, देहूरोड परिसरातील गतिरोधक काढून टाकावेत, तसेच सर्व परिसर स्वच्छता ठेवण्यात यावी व वारकऱ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी देहूगाव येथील श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पालखी सोहळा सोमवारी प्रस्थान ठेवत असून, मंगळवारी सकाळी मार्गस्थ होणार आहे. दुपारी चिंचोली येथील शनी मंदिर परिसरात दुपारचा विसावा राहणार आहे. शनी मंदिर परिसरात लांबलचक चर खोदण्यात आलेले असून, त्यामुळे विसाव्याच्या वेळी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची
मोठी गैरसोय होण्याची शक्यता
आहे. देहूरोड परिसरात पालखी मार्गावर विविध ठिकाणी
गतिरोधक बसविण्यात आले आहेत. परिसरात स्वच्छता व साफसफाई करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे .
बोर्डाच्या एका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचोलीतील मोठे चर बुजविण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच कामाला सुरुवात होणार
असून, बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळा ते निगडी या संपूर्ण पालखी मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता करण्यात येत आहे.
रस्त्यालगत असणारा सर्व कचरा, राडारोडा, प्लॅस्टिक कागद उचलण्यात येत आहेत. रस्त्यालगत असणारी लहान झाडे छाटणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. प्रस्थान
सोहळा झाल्यांनतर काही वारकरी चिंचोली, झेंडेमळा येथे
मुक्कामासाठी तसेच मंगळवारी चिंचोलीत विसावा असल्याने सकाळपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता ठेवण्यासाठी कार्यरत असणार आहेत. (वार्ताहर)