गोहत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By Admin | Updated: June 12, 2017 01:31 IST2017-06-12T01:31:09+5:302017-06-12T01:31:09+5:30
देशभरात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित लागू करावा, तसेच गोहत्या करणाऱ्या केरळमधील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासह विविध मागण्यांसाठी रविवारी

गोहत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : देशभरात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित लागू करावा, तसेच गोहत्या करणाऱ्या केरळमधील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासह विविध मागण्यांसाठी रविवारी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने चिंचवडमधील चापेकर चौकात आंदोलन करण्यात आले.
यासह नक्षलवादी कारवायांत गुंतलेल्या देहली विश्वविद्यालयाच्या नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांच्यावर कारवाई करण्यात यावी, बंदी घातलेल्या झाकीर नाईकच्या शाळा चालविण्यास घेणाऱ्या आबू आझमी यांची चौकशी करावी, यासह साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर रासायनिक लेपन करून देवीच्या मूर्तीशी खेळ करणारे कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. हत्येच्या उद्देशाने केली जाणारी पशूंची खरेदी-विक्री यांवर निर्बंध आणल्यानंतर केरळमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोहत्या केली. तरी गोहत्या करणे, गोवंशहत्या बंदी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.