बोगस लाभार्थींवर कारवाईची मागणी
By Admin | Updated: December 23, 2016 00:44 IST2016-12-23T00:44:44+5:302016-12-23T00:44:44+5:30
आर्थिक दुर्बल घटकाच्या घरकुल योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील घरकुलधारकांना घरे मिळावीत व बोगस लाभार्थींवर कारवाई करण्यात

बोगस लाभार्थींवर कारवाईची मागणी
पिंपरी : आर्थिक दुर्बल घटकाच्या घरकुल योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील घरकुलधारकांना घरे मिळावीत व बोगस लाभार्थींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्तांशी चर्चा करून व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन बोगस लाभार्थींवर कारवाई करू, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी दिले. आंदोलनात कार्याध्यक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, धर्मराज जगताप, काळुराम वाघ, सुरेश आहिरे आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)