देहूगावचे उपसरपंच साळुंकेंचा राजीनामा

By Admin | Updated: December 22, 2016 02:13 IST2016-12-22T02:13:12+5:302016-12-22T02:13:12+5:30

देहूचे उपसरपंच सचिन साळुंके यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या मासिक सभेत हा राजीनामा मंजुरीसाठी

Dehugaon's Sub-Inspector Salunken resigns | देहूगावचे उपसरपंच साळुंकेंचा राजीनामा

देहूगावचे उपसरपंच साळुंकेंचा राजीनामा

देहूगाव : देहूचे उपसरपंच सचिन साळुंके यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या मासिक सभेत हा राजीनामा मंजुरीसाठी मांडण्यात येणार असून, हा राजीनामा मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुनीता टिळेकर यांनी दिली.
साळुंके यांच्या राजीनाम्याने उपसरपंचपदाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांचा जवळपास दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून, यापूर्वी अभिजित काळोखे हे उपसरपंच होते. त्यानंतर सचिन साळुंके हे उपसरपंच झाले होते.
यानंतर महिला सदस्यांना उपसरपंचपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याने महिला सदस्यांमध्ये त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dehugaon's Sub-Inspector Salunken resigns