शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याच्या प्रस्तावाचे देहूरोडमध्ये स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 16:00 IST

लष्कराकडून देशातील कॅंटाेन्मेंट बंद करण्याच्या निर्णयाचे देहूराेड मधील रहिवाश्यांनी स्वागत केले अाहे. तसेच येथील भागाचा महापालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी करण्यात येत अाहे.

देहूरोड : लष्कराकडून देशभरातील सर्व 62  कँटोन्मेंट बोर्ड बंद करण्याचा  विचार केला जात असून संबंधित प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर केला आहे . याबाबतचे वृत्त  लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी देहूरोड परिसरातील नागरिक, विविध राजकीय पक्ष , लोकप्रतिनिधी यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले मात्र बोर्डाचा नागरी भाग जवळच्या महापालिकेकडे वर्ग करण्याऐवजी देहूरोडला  स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करावी तसेच देहूरोड दारुगोळा कोठाराच्या  रेडझोनचा प्रश्न अगोदर मार्गी लावल्याशिवाय अंतिम निर्णय घेतल्यास परिसराच्या विकासासाठी अडथळ्याचे शर्यत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे . 

      देशातील कँटोन्मेंट बोर्डांवर  होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कँटोन्मेंटमधील लष्करी भागात 'विशेष लष्करी ठाणे' तयार केले जाणार असून, नागरी भाग लगतच्या महापालिकेकडे वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. वास्तविक देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला गेल्या वर्षापर्यंत कोणतेही अनुदान केंद्राकडून मिळत नव्हते . गेल्या वर्षी प्रथमच स्वच्छता अभियानासाठी दोन  कोटी रुपये प्रथमच  बोर्डाला मिळाले होते . 

      देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून लष्करी भागातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित विविध लष्करी संस्थांना देण्यात येणाऱ्या सुविधांपोटी आकारलेल्या सेवा कराची थकबाकी  सुमारे 175 कोटींच्या वर पोहचली आहे . थकीत सेवा कर तसेच कोणतेही अनुदान मिळत नसल्याने  बोर्डाला मोठ्या योजना राबविण्यास समस्या येत असून  विकासकामे करताना मर्यादा येत आहेत . प्रामुख्याने बोर्डाच्या विविध भागात गेल्या अनेक वर्षात साधे रस्तेही बनविण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असून रस्त्यांवरून अनेकदा वादाचे प्रसंग येत असतात .काही भागात गटारांची व्यवस्था अपुरी असून चिंचोलीच्या काही भागात  तर गेल्या 27-28 वर्षात गटारी दुरुतीसाठी निधी देण्यात अपयश आले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना बोर्डाकडून फक्त कर वसुली केली जात आहे .नागरिकांना मूलभूत  सुविधा पुरविण्यास बोर्डाला अपयश आलेले आहे . काही भागातील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्याद्वारे नदीत जात आहे . काही भागात अद्यापही पिण्याचे पाणी पोहचले नाही . नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी केंद्र अगर राज्य सरकार अनुदान देत नाही . केंद्र व राक्याच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळत नाही . 

      देहूरोड भागात असणाऱ्या सर्व झोपडपट्ट्यांचा विकास होणे गरजेचे असताना हद्दीतील झोपडपट्ट्या अनधिकृत असल्याचे पालुपद आळविले जात आहे. सरकारकडून झोपडपट्टी म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मुलभुत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे बोर्ड व्यवस्थेला वैतागलेल्या नागरिकांनी लोकमतच्या शनिवारच्या अंकातील " सर्व 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याचा प्रस्ताव " या शीर्षकाने प्रसिद्ध झालेले वृत्त वाचल्यानंतर या प्रस्तावाचे सर्व थरातून स्वागत केले जात आहे .  देहूरोड कॅन्टोनमेंट  असून अडचण नसून खोळंबा " बनले  असल्याने नागरिकांसह  विविध राजकीय पक्षांनी प्रस्ताव योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे .  मात्र  प्रस्तावानुसार कॅन्टोन्मेंटचा  नागरी भाग जवळच्या महापालिकेत वर्ग न करता देहूरोडची लोकसंख्या पन्नास हजाराहून अधिक असल्याने येथे ब वर्ग नगरपरिषद स्थापन करणे शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात अाहे. तसेच  देहूरोड येथील दारुगोळा गोळा कोठाराच्या रेडझोनचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय बोर्ड बंद करून महापालिकेत वर्ग करणे अगर स्वतंत्र नगरपरिषद स्थापन केल्यास विकासकामे करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागल्याची भीती व्यक्त केली आहे . 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेdehuroadदेहूरोडnewsबातम्या