दुसऱ्या मजल्यावरून पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:27 IST2018-01-01T17:23:56+5:302018-01-01T17:27:07+5:30
दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्राक अमोल मंजाळ हा २ वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला. ही घटना काळेवाडी येथील तापकीर नगर येथे घडली.

दुसऱ्या मजल्यावरून पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील घटना
ठळक मुद्दे१जानेवारी रोजी दुपारी १२च्या सुमारास घडली घटना राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता रुद्रांक
रहाटणी : इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्राक अमोल मंजाळ हा २ वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला. ही घटना काळेवाडी येथील तापकीर नगर येथे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १जानेवारी रोजी दुपारी १२च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रुद्रांक हा दुपारी बबाई निवास या राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता, दुपारी बाराच्या सुमारास तो खेळत असताना खाली पडला, त्याला उपचारासाठी वाय सी एम येथे दाखल करण्यात आले, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.