विष प्राशन केलेल्या तरूणीचा मृत्यू

By Admin | Updated: April 24, 2017 04:51 IST2017-04-24T04:51:07+5:302017-04-24T04:51:07+5:30

विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणीचा रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सुषमा श्याम कांबळे (वय १६) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Death of a teenaged poisonous animal | विष प्राशन केलेल्या तरूणीचा मृत्यू

विष प्राशन केलेल्या तरूणीचा मृत्यू

पिंपरी : विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणीचा रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सुषमा श्याम कांबळे (वय १६) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरूणी साईसागर कॉलनी, रहाटणी येथे राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल श्याम कांबळे (वय ३६, रा. साईसागर कॉलनी, रहाटणी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अचानक चक्कर आल्याने शनिवारी, १५ एप्रिलला रात्री तिला वायसीएममध्ये उपचारासाठी दाखल केले होते. आठ दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला, हे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death of a teenaged poisonous animal