शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू समोर उभा होता पण एका चहाच्या कपाने वाचवला त्याचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 21:23 IST

रस्त्याच्या कडेला दोन ट्रेलर थांबले होते. यातील एकाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे तो ट्रेलर त्याच्या पुढच्या ट्रेलरवर धडकला. यात ट्रेलरचा चालक जखमी झाला. मात्र...

पिंपरी : रस्त्याच्या कडेला दोन ट्रेलर थांबले होते. यातील एकाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे तो ट्रेलर त्याच्या पुढच्या ट्रेलरवर धडकला. यात ट्रेलरचा चालक जखमी झाला. मात्र दुसऱ्या  ट्रेलरचा चालक चहा प्यायला गेल्याने तो या अपघातातून बचावला. मुंबई-बंगळुरू महामार्गावर ताथवडे येथे मंगळवारी (दि. ३) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.शबीर खान (रा. मध्यप्रदेश) असे बचावलेल्या ट्रेलरचालकाचे नाव आहे. आशुतोष हृदयनारायण त्रिपाठी (वय २२, रा. इच्छापूर, हजिरा रोड, सुरत, गुजरात), असे जखमी ट्रेलरचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मंजित राजेंद्रसिंग चौधरी (वय ३३, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी, मूळगाव जिताखोरी, ता. भवानीखेडा, जि. भिवानी, हरियाणा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुजाहिद कमरुद्दीन खान (वय ३०, रा. देवेसरम, ता. गोवर्धन, जि. मथूरा, उत्तरप्रदेश) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे.हिंजवडी पोलीस ठाण्याचे हवालदार व्ही. एम. फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. जखमी त्रिपाठी हा त्यांचा ट्रेलरचा  चालक आहे. ट्रेलरमधून ऑईल गळती होत असल्याने चालक त्रिपाठी याने त्याचा ट्रेलर मुंबई-बंगळुरू महामार्गावर ताथवडे येथे रस्त्याच्या कडेला थांबविला होता. त्याचवेळी शबीर खान याने त्याचा ट्रेलर त्रिपाठी याच्या ट्रेलरच्या पाठीमागे थांबविला होता. त्यानंतर त्रिपाठी आॅईल गळतीची पाहणी करण्यासाठी ट्रेलरच्या खाली गेले होते. तर शबीर खान चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी मुजाहिद खान याच्या भरधाव ट्रकने शबीर खान याच्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो ट्रेलर त्रिपाठी यांच्या ट्रेलरवर जाऊन धडकला. यात ट्रेलरचे चाक त्रिपाठी यांच्या पायावरून गेले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.दरम्यान ट्रकने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, शबीर खान याचा ट्रेलर पुढच्या ट्रेलरला धडकला. यात शबीर याच्या ट्रेलरच्या इंजिनच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शबीर खान त्यावेळी चहा प्यायला गेल्याने तो ट्रेलरमध्ये नव्हता. त्यामुळे तो या अपघातातून सुदैवाने बचावला. तर धडक दिलेल्या ट्रकचा चालक मुजाहिद खान हा देखील यात किरकोळ जखमी झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSocial Viralसोशल व्हायरल