मांजा स्फोटातील आकाशचा मृत्यू
By Admin | Updated: January 28, 2017 00:26 IST2017-01-28T00:26:32+5:302017-01-28T00:26:32+5:30
इमारतीच्या बाल्कनीतुन पतंग उडविताना उच्चदाब वाहिनीत मांजा अडकून झालेल्या स्फोटात तीन जखमी निष्पाप बालकांपैकी

मांजा स्फोटातील आकाशचा मृत्यू
वाकड : इमारतीच्या बाल्कनीतुन पतंग उडविताना उच्चदाब वाहिनीत मांजा अडकून झालेल्या स्फोटात तीन जखमी निष्पाप बालकांपैकी आकाश प्रजापती याला प्राण गमवावा लागला. या दुर्घटनेत नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आर्यन गोपाळ आणि अभिनंदन गोपाळ या दोघा चिमुरड्यांवर उपचार सुरू आहेत. थेरगावच्या या परिसरात प्रामुख्याने मध्यमवर्गीय, कामगार वर्गाचे वास्तव्य आहे. रोजगारासाठी देशभरातून आलेली कुटुंबे येथे स्थायिक आहेत. त्यांपैकीच प्रजापती आणि गोपाळ ही दोन कुटुंबे या चाळीत भाड्याने राहतात. मात्र, अचानक घडलेल्या या अनपेक्षित घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेस जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)