पीएमपीच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू

By Admin | Updated: March 11, 2017 03:17 IST2017-03-11T03:17:50+5:302017-03-11T03:17:50+5:30

पीएमपीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार अभियंता तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास जगताप डेअरी येथील वाय जंक्शन येथे घडली.

Death of engineer of PMP | पीएमपीच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू

पीएमपीच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू

वाकड : पीएमपीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार अभियंता तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास जगताप डेअरी येथील वाय जंक्शन येथे घडली.
विजयकुमार वीरपक्ष स्वामी (२४, सध्या रा. थेरगाव, मूळ उस्मानाबाद) असे अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी - स्वामी हे बाणेर येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. शुक्रवारी सकाळी ते थेरगावहून बाणेरला निघाले होते. दरम्यान, वाय जंक्शन येथे आले असता, पीएमपीची त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना त्वरित औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. (वार्ताहर)

Web Title: Death of engineer of PMP