शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांनी वेळेत पंचनामा न केल्याने मृतदेह शवागृहात पडून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 19:26 IST

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पंचनामा न झाल्याने पाच मृतदेह सात तास तसेच ठेवले. मृत्यूनंतरदेखील मृतांनाही प्रशासनाचा हलगर्जीपणा सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांचा संताप, पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील प्रकार पोलीसांनी वेळेत पंचनामा न केल्याने मृतदेह शवागृहात पडून 

पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पंचनामा न झाल्याने पाच मृतदेह सात तास तसेच ठेवले. मृत्यूनंतरदेखील मृतांनाही प्रशासनाचा हलगर्जीपणा सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. हा प्रकारी मंगळवारी घडला. शाहूनगर येथील सुभाष पांडुरंग सोनवणे (वय ६०) यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वायसीएममध्ये आणला. त्याचप्रमाणे रामनगर येथील इंद्रभान आनंद भोर (वय ७२) आणि सोनाबाई बापू विटकर (वय ७५) यांचाही दीर्घ आजारांने मृत्यू झाला. याबरोबरच अजून तीन मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शवागृहात आणले. मात्र सकाळपासून एकही शवविच्छेदन झाले नसल्याने नातेवाइकांनी शवागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात शवविच्छेदनासंबंधित अहवाल बनविण्यासाठी दरदोज एका पोलीस ठाण्याच्या टीमने कर्तव्य बजावण्याचे ठरले आहे. त्यानुसार आज तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचा नंबर होता. मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याची टीम दुपारी दोनपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यास विलंब झाला. नातेवाइकांनी शवागृहाबाहेर गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. 

दु:खाच्या प्रसंगात क्लेषदायक वागणूकमयत इंद्रभान आनंद भोर यांचे नातेवाईक शरद दौंडकर म्हणाले, ‘‘आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही सकाळीच रुग्णालयात दाखल झालो. आम्हाला सकाळी १० वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात मिळेल असे सांगण्यात आले, मात्र दुपारी दोन वाजले तरी पंचनामा करण्यासाठीही पोलीस आले नाहीत. सगळे नातेवाईक घरी वाट पाहत आहेत. दु:खमध्ये असतानाही आम्हाला प्रशासनाकडून अशी वेदनादायक वागणूक मिळत आहे.’’

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPoliceपोलिसDeathमृत्यू