शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
2
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
3
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
4
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
5
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
6
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
7
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
8
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
9
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
10
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
11
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
12
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
13
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
14
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
15
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
16
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
17
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
18
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
19
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
20
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश

उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:07 AM

स्वाइन फ्लूने गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कहर केला असून, आता डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वाइन फ्लूने गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कहर केला असून, आता डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.सप्टेंबर या महिन्यामध्ये तापाचे तीन हजार १४० रुग्ण आढळले आहेत. त्यातील १८३ संशयित रुग्णांपैकी २६ रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत ९५४ रुग्णांपैकी ८७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. डेंगीची लागण झाल्यावर डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये या लक्षणांमध्ये वाढ होते. उच्च ताप, पुरळ आणि स्नायू यामध्ये तीव्र वेदना होतात. प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा वेळी रक्तस्राव होण्याची शक्यता असते. रक्तस्राव झाल्यामुळे रक्तदाब वाढून श्वसन प्रक्रियेवर परिणाम होतो. ही शेवटची स्थिती मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते.डेंगी हा विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडिस या डासांमार्फत होतो. आजारी माणसाच्या रक्तातील डेंगी विषाणू इडिस जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसºया निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात. हे डास समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतात. इडिस हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो.ताप आल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घराजवळ असलेल्या रिकाम्या भांड्यांमध्ये, कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावेत. डेंगीच्या आजारावर प्रतिजैविक लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे वाटल्यास डॉक्टरांकडून शहानिशा करून त्वरित उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्य