पालखी मार्गावर धोकादायक गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:37 IST2016-06-22T00:37:59+5:302016-06-22T00:37:59+5:30

संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होण्यास जेमतेम सहा दिवस उरले असताना पालखी मार्गावरील व विविध पालखी तळांवर शासकीय स्तरावर विविध सोयी-सुविधा देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली

Dangerous Breakthrough on the Palkhi Road | पालखी मार्गावर धोकादायक गतिरोधक

पालखी मार्गावर धोकादायक गतिरोधक

देहूरोड : संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होण्यास जेमतेम सहा दिवस उरले असताना पालखी मार्गावरील व विविध पालखी तळांवर शासकीय स्तरावर विविध सोयी-सुविधा देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, देहूरोडच्या लष्करी हद्दीत देहूगाव -देहूरोड रस्त्यावर गेल्या आठवड्यात बसविण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने गतिरोधक काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
तसेच, चिंचोली येथील पालखीच्या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी
गेल्या वर्षी खोदण्यात आलेले चर बुजविले नसल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे.
देहूगाव -देहूरोड पालखी मार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व स्थानिक लष्कराच्या हद्दीत सीओडी डेपो ते पुणे-मुंबई महामार्गदरम्यान विविध ठिकाणी अशास्त्रीय गतिरोधक (डांबर व खडीच्या साह्याने) बनविण्यात आलेले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात लष्करी हद्दीत दोन ठिकाणी कठीण रबराचे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यातील एक गतिरोधक काही ठिकाणी खिळे बाहेर येऊन खराबही झाला आहे. दुसराही खराब होण्याची शक्यता दिसत आहे. भारतीय रस्ते काँग्रेसच्या निकषाप्रमाणे कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक बनविताना ठरावीक रुंदी व उंची ठेवणे बंधनकारक असते. तसेच गतिरोधकाच्या अगोदर ५० मीटर अंतरावर पुढे गतिरोधक असल्याचा मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक असते. गतिरोधक दिसण्यासाठी पट्टे मारावे लागतात, जेणेकरून वाहने आदळून चालकांना अपघात होऊ नये, अगर आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. मात्र, या ठिकाणी बनविण्यात आलेले गतिरोधक निकषाप्रमाणे बनविण्यात आलेले नाहीत. गतिरोधकांच्या अगोदर दोन्ही बाजूंना मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसण्यासाठी रेडियम अगर ब्लिंकर लावणे गरजेचे असताना लावण्यात आलेले नाही. परिणामी, वाहने आदळून वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचा व मानेला झटका बसण्याचे प्रकार घडत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतिरोधक दिसल्याने एखादे वाहन अचानक थांबल्याने दुसरे वाहन त्यावर आदळण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
मंगळवारी येथून जाणारा पालखी रथ, दिंड्या व भाविकांची हजाराहून अधिक वाहनांना या गतिरोधकामुळे फटका बसण्याची शक्यता असून, संबंधितांना निकषानुसार नसलेले सर्व गतिरोधक तातडीने काढण्याबाबत सूचित करावे, अशी मागणी स्थानिकांतून व भाविकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Dangerous Breakthrough on the Palkhi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.