शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शुभेच्छापत्रांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:50 IST

सोशल मीडियाचा परिणाम; स्मार्ट फोनमुळे संदेश पाठविण्याच्या पारंपरिक प्रथेकडे दुर्लक्ष

किवळे : दिवाळीनिमित्त आप्त-मित्रांसह इतरांना काव्यमय शब्दांत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बाजारात निरनिराळ्या प्रकारची शुभेच्छापत्रे उपलब्ध असली, तरी ग्राहकांचा त्याला अगदी अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.स्मार्ट फोनवर फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप अशा विविध समाज माध्यमांतील ‘स्मार्ट’ भाषेमुळे शुभेच्छा पाठविण्याच्या पद्धती अधिक आधुनिक होत असून, त्यांचे स्वरूप बदलले आहे. परिणामी दिवाळी शुभेच्छापत्रांच्या मागणीला मोठी ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. ठरावीक लोकप्रतिनिधी, राजकारणी, तसेच काही संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सहकारी बँकांचे संचालकवगळता दिवाळी शुभेच्छापत्रे देणाऱ्यांची संख्या घटली आहे.शहरी व निमशहरी भागात गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्रांद्वारे शुभेच्छा देण्याची पद्धत सर्वत्र रूढ होती. त्यामुळे मराठी व इंग्रजी भाषेतील शुभेच्छापत्रांची बाजारात चलती असायची. दिवाळीच्या चार-पाच दिवस अगोदरपासूनटपालाने शुभेच्छापत्रे येत असत. मोठ्या उत्साहाने शुभेच्छापत्रांचे घराघरांत वाचन केले जायचे. मात्र स्मार्ट फोनच्या जमान्यात शुभेच्छापत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. भ्रमणध्वनींवरून पाठविण्यात येणारे संदेश, व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुकसारखा सोशल मीडिया (समाज माध्यम) याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. साधारणपणे पंधरा-वीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतच्या किमतीत ही शुभेच्छापत्रे सध्या ठरावीक दुकानांत उपलब्ध असली, तरी पुरवठा व मागणी यात मोठी तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे.व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी स्मार्ट माध्यमांमुळे शुभेच्छापत्रांना असणारी मागणी खूपच कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बदलत्या काळाबरोबर भावना व्यक्त करण्याची माध्यमे बदलत असल्याने शुभेच्छापत्रांच्या बाबतीत नव्या माध्यमांच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे.दिवाळी शुभेच्छापत्रे खरेदी करण्यासाठी येणाºया ग्राहकांची संख्या अलीकडच्या काळात फारच कमी होत चालली आहे. शिवाय स्मार्ट फोनमुळे हव्या त्या व्यक्तीशी समोरासमोर (व्हॉट्स अ‍ॅप कॉल वा व्हिडीओ कॉल) संपर्क होत असल्याने हल्लीच्या तरुणी-तरुणांचा शुभेच्छापत्रे घेण्याकडे कल खूपच कमी झाला आहे. राजकीय नेते, पदाधिकारी, काही बँक, व्यावसायिक कार्यालये यांत दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात शुभेच्छापत्रे घेतली जात असत. परंतु या वर्षी त्यांच्याकडूनही अजिबात मागणी आली नसल्याचे छपाई व्यावसायिकांनी सांगितले. काही पदाधिकारी वगळता दर वर्षी दिवाळीच्या सणानिमित्त शुभेच्छापत्रांना असणारी मागणी या वर्षी खूप कमी झाली आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीMobileमोबाइलWhatsAppव्हॉट्सअॅपSocial Mediaसोशल मीडिया