शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पिंपरी- चिंचवड गावातील 'या' भागात संचारबंदी; अंगारकी चतुर्थीनिमित्त गर्दी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 2:31 PM

अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथे चिंतामणी गणेश मंदिरात दर्शनासाठी तसेच महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी ८० ते ९० हजार भाविक हजेरी लावतात.

पिंपरी : अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथील श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व मंगलमूर्ती वाडा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून, निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. २) अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथे चिंतामणी गणेश मंदिरात दर्शनासाठी तसेच महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी ८० ते ९० हजार भाविक हजेरी लावतात. मंगळवारी देखील अशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांकडून जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री बारापर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

...या भागात संचारबंदी, जमावबंदी... चिंचवड गावातील पडवळ आळी, सुखकर्ता अपार्टमेंट चाैक, जिजाऊ पर्यटन केंद्र, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चाैक, मंगलमूर्ती वाडा परिसर, चिंतामणी गणेश मंदिर/मोरया यात्री निवास, मोरया प्रसाद हाॅल समोरील रस्ता, मोरया गोसावी मंदिर परिसरात संचारबंदी व जमावबंदी राहणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसcommissionerआयुक्त