शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी; महापालिकेकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 20:19 IST

नवीन कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भोसरीत स्वतंत्र रुग्णालय

ठळक मुद्देसंस्थात्मक विलगीकरणासाठी दोन हॉटेल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यु (संचारबंदी) लागू केली आहे. ही संचारबंदी जानेवारीपर्यंत असेल. नवीन कोरोना विषाणूचा शहरात प्रसार होवू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे..................

नवीन उत्परिवर्तन करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परदेशी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी भोसरीतील महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. तसेच वाकड येथील दोन हॉटेलही प्रवाशांच्या कॉरंटाईनसाठी सज्ज ठेवली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूचा  प्रसार होवू नये, यासाठी महापालिकेने दक्षता घेण्यात येणार आहे. लंडनवरून येणाºया प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चाने त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहे. हवाई प्रवाशांना शोधण्यासाठी कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांची नियुक्ती केली आहे. नवीन विषाणूच्या पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी भोसरीत नवीन रुग्णालय सज्ज ठेवले आहे..................................परदेशातून येणाऱ्या हवाई प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चानेसात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. प्रवासी येताना लक्षणे आढळून आल्यास त्यास पुढील उपचारासाठी थेट भोसरीतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. जुन्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नवीन विषाणूच्या रुग्णांना ठेवले जाणार नाही.अजित पवार, अतिरिक्त आयुक्त..........................

१८ रुग्णांना करणार स्थलांतरितभोसरीतील रुग्णालयात जुन्या कोरोनाच्या १८ रुग्ण आहेत. त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात येणार आहे. तसेच परदेशातून येणाºया प्रवाशांचे आगमान झाल्या-झाल्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार नाही. पाचव्या ते सातव्या दिवसादरम्यान विलगीकरण केलेल्या प्रवाशांना स्व:खर्चाने आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. चाचणी निगेटीव्ह आढळल्यास प्रवाशाला पाच ते सात दिवसांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षातून सोडण्यात येईल. या प्रवाशास सात दिवसांचे अनिवार्य होम क्वारंटईन असेल. आरटीपीसीआरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. परंतु, लक्षणे नसल्यास त्याच हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात येईल. त्याचा कालावधी १४ दिवसांपर्यंत असेल. हॉटेलच्या शुल्कानुसार प्रवाशांना शुल्क आकारण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. .  ............

परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल मार्फत करण्यात येईल. सर्व प्रवाशांचे पासपोर्ट पासपोर्ट जमा केले जातील. विलगीकरण संपल्यानंतर ते परत केले जाणार आहेत. प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी खासगी प्रयोगशाळांमार्फत करण्यात येईल. त्याबाबतचे शुल्क प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे.  - श्रावण हर्डीकर आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरPoliceपोलिस