शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात हल्लाबोल, भाजपा सरकार फेकू असल्याची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:11 IST

भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पिंपरी : भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकुर्डी गावठाण ते प्राधिकरण तहसील कार्यालयापर्यंत ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या समारोपावेळी घेण्यात आलेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी हल्लाबोल आंदोलनामागील भूमिका विशद केली.ते म्हणाले, की सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अशी हल्लाबोल आंदोलने राज्यात सर्वत्र होणार आहेत. २९ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन होईल. १ ते १२ डिसेंबर या कालावधीत यवतमाळ ते नागपूर असे आंदोलन करण्यात येणार आहे.ज्या पिंपरी-चिंचवडला स्वच्छतेचा मान मिळवून दिला, त्या शहरात कचºयाचे ढीग दिसून येतात. अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्ती माफ करू ही त्यांची आश्वासने हवेत विरली आहेत.भाजपा सरकार अपयशी पडू लागल्याचे निवेदन अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे यांच्याबरोबर जाऊन अप्पर तहसीलदार संजय भोसले यांना दिले.महापालिकेत, राज्यात, देशात त्यांची सत्ता असताना प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागते. सांगली प्रकरणात एका निष्पाप तरुणाला केवळ संशयावरुन पकडून पोलिसांनी जिवंत मारले. एवढेच नव्हे, तर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. भाजपा सरकारच्या काळात माणसे जिवंत जाळली जात आहेत, ही शोकांतिका आहे. भाजपा नेत्यांना बोलताना तारतम्य नसल्याचे पवार यांनी नमूद केले. पालकमंत्रीच सभेत दारूला महिलेचे नाव द्या, जास्त विक्री होईल असा सल्ला देतात. राज्याचे प्रमुख दस्तुरखुद्द मुख्यमंत्री भर सभेत नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढतात. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून काय आभाळ फाटलं का?

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड