शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयामुळे गुन्हे झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:53 IST

गेल्या वर्षीच्या व यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांचा तुलनात्मक आढावा घेतला असता गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देगंभीर गुन्ह्यांत झाली घट : गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले

नारायण बडगुजर-   पिंपरी : उद्योगनगरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासून गुन्हेगारी कमी झाली आहे. गुन्हे दाखल होण्याचे आणि तपास निष्पन्न होण्याचे प्रमाण वाढले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, दरोडा, चोरी, वाहनचोरी आदी गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत एकूण ३३९७ तर यंदा ३६२० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झाले. पुरेसे मनुष्यबळ नसतानाही पोलीस सक्षमपणे काम करीत आहेत. महापालिका हद्दीतील निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, वाकड, दिघी, चिखली या नऊ तसेच महापालिका हद्दीबाहेरील हिंजवडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी या सहा ठाण्यांचा आयुक्तालयात समावेश आहे. गंभीर स्वरूपातील गुन्ह्यांवर नियंत्रण आले आहे. २०१८ मध्ये जानेवारी ते जून व २०१९ मध्येही जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या व यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांचा तुलनात्मक आढावा घेतला असता गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. वाहनचोरीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत ६४९ तर यंदा ६०२ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४७ गुन्हे कमी झाले आहेत. 

फसवणुकीचे प्रमाण वाढले विविध प्रकारे गंडा घालून फसवणूक केली जाते. आॅनलाइन व्यवहारातून, विश्वास संपादन करून, शेतजमीन, जागा, घर खरेदी-विक्री तसेच काही संकेतस्थळांवरून वाहने तसेच इतर साहित्य खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून, गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत १६२ तर यंदा पहिल्या सहा महिन्यांत २०३ गुन्हे दाखल झाले आहेत. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहनचालविण्याचे प्रकार वाढले आहेत. पहिल्या सहा महिन्यांत १६२ जणांचा मृत्यू झाला.

गंभीर गुन्हे...बलात्काराचे गुन्हे गेल्या वर्षी ८० होते. त्यात घट होऊन यंदा ७३ गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी २२ असलेले दरोड्याचे गुन्हे यंदा १५ झाले. गेल्या वर्षी चोरीचे गुन्हे १२४५ होते त्यात ९९ ने घट होऊन यंदा ११४६ गुन्ह्यांची नोंद झाली. घरफोडीच्या गुन्हे ३३ वरून ३५ झाले आहेत.

१ जानेवारी ते ३० जून दरम्यानचे गुन्हे                                    २०१८    २०१९खून                              ३४          ३१खुनाचा प्रयत्न              ६४          ५०सदोष मनुष्यवध          ५              १हयगयीने मृत्यू            १६२       १६२दरोडा                           २२           १५चोरी                           १२४५    ११४६घरफोडी                      ३३         ३५वाहनचोरी                   ६४९       ६०२बलात्कार                     ८०        ७३फसवणूक                    १६२       २०३एकूण गुन्हे                ३३९७     ३६२०

प्रतिबंधात्मक     १९८७    २५११कारवाईमोका        २    २एमपीडीए    —    २तडीपार        ४५    ७८

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी