शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांचा टोल न दिल्याने कुख्यात गुंड गजा मारणेवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 20:34 IST

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले कारवाईचे आदेश

पिंपरी : कुख्यात गुंड गजानन मारणे व त्याच्या साथीदारांनी उर्से टोलनाका येथे दहशत माजविल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे या नाक्यावर टोल न भरता वाहने घेऊन गेल्याने मारणे व साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.

कुख्यात गुंड गजा मारणे हा १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहनांचा ताफा घेऊन जात होता. त्यावेळी उर्से टोलनाका येथे त्याच्या साथीदारांनी आरडाओरडा करून फटाके वाजवून ड्रोनव्दारे त्याचे चित्रिकरण करून दहशत माजविली होती. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी ३३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गजा मारणे फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. यात मारणे व त्याच्या साथीदारांनी टोल न देता वाहने गेल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

सिक्युरिटी एजन्सीचा परवाना होणार रद्दद्रुतगती मार्गावरून काढलेल्या मिरवणुकीत गुंड मारणे याच्यासोबत स्टार सिक्युरिटी एजन्सीचे बाऊन्सर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या एजन्सीचा परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करून परवाना रद्द करण्यात येणार आहे. 

टोन न भरता वाहन घेऊन जाणे ही संबंधित टोल वसूल करणारी कंपनी व शासनाची फसवणूक आहे. मारणे याच्या वाहनांचा ताफा उर्से टोल नाका येथे असताना त्यांनी इतर वाहनांना बाजूला करून त्यांची वाहने टोल न देता नेली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtollplazaटोलनाका