पिंपरी : सुतारकाम करण्यासाठी आलेल्या तरुणाने दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केला. वाकड येथे रविवारी (दि. १६) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.सहिराम (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहिराम हा फिर्यादी महिलेच्या घरी सुतारकाम करण्यासाठी आला होता. त्यावेळी बाथरूमचे लॉक दाखविण्याच्या बहाण्याने आरोपी सहिराम याने फिर्यादी यांच्या दहा वर्षीय मुलीला बाथरूममध्ये नेले. तेथे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपी सहिराम याने मुलीचा विनयभंग केला. वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 19:28 IST