विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा
By Admin | Updated: October 15, 2016 02:49 IST2016-10-15T02:49:20+5:302016-10-15T02:49:20+5:30
झुरळ मारण्याचे औषध प्राशन केलेल्या विकासनगर येथील प्राजक्ता सुरेश कुलथे (वय २६) या विवाहितेचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा
देहूरोड : झुरळ मारण्याचे औषध प्राशन केलेल्या विकासनगर येथील प्राजक्ता सुरेश कुलथे (वय २६) या विवाहितेचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारा दरम्यान सोमवारी मृत्यु झाला. या प्रकरणी पती रोहित सुरेश कुलथे, सासरे सुरेश पोपट कुलथे, सासू सुरेखा सुरेश कुलथे यांच्या विरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पती रोहित यास अटक केली आहे.
विवाहितेच्या बहिणीस नाशिकला गेल्यांनतर एका वहीत मिळालेल्या चिठ्ठीवरून सासरच्याकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचे समजल्यावरून देहूरोड पोलिसांकडे विवाहितेचे वडील सुनील एकनाथ महालकर (रा. द्वारका, नाशिक) यांनी फिर्याद दिली. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.