शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या निळ्या पूररेषेत राडारोडा टाकल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:05 IST

पवना नदीच्या पात्रात निळ्या पुररेषेमध्ये आरोपींनी अनधिकृतरीत्या मुरूम राडारोडा टाकून भराव केला.

ठळक मुद्देकासारवाडी येथे पुलाजवळ घडला होता प्रकार

पिंपरी : पवना नदीच्या निळ्या पूररेषेत बिगर परवाना राडारोडा टाकला. तसेच अनधिकृतरित्या भराव केला. कासारवाडी येथे पिंपळे गुरव पुलाजवळ १८ फेब्रुवारी २०२० रोजी हा प्रकार घडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. त्यानुसार याप्रकरणी ५४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता राजेंद्र वसंतराव डुंबरे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जालिंदर किसन लांडे, विजया दत्तात्रय लांडे, बाळू किसन लांडे आणि सातबारा उताºयावर नावे असेलेल्या अन्य ५१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे पिंपळे गुरव पुलाजवळ पवना नदीच्या पात्रात निळ्या पुररेषेमध्ये आरोपींनी अनधिकृतरीत्या मुरूम राडारोडा टाकून भराव केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास ही बाब आली. भराव काढून घेण्याबाबत महापालिकेच्या या विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र, आरोपींनी नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला नाही. त्यामुळे महापालिकेकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार महराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९९६ चे कलम ५३ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ क २६०, २६१, २६७, आणि ४७८ नुसार आरोपी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसriverनदी