बांधकाम साइटवर क्रेन तुटल्याने दुर्घटना
By Admin | Updated: February 5, 2017 03:30 IST2017-02-05T03:30:19+5:302017-02-05T03:30:19+5:30
हिंजवडी -माण आयटी पार्क परिसरात एका बांधकाम साइटवर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास बांधकामावरील क्रेन कोसळल्याने एक मजूर ठार झाला असून, तीनजण जखमी

बांधकाम साइटवर क्रेन तुटल्याने दुर्घटना
वाकड : हिंजवडी -माण आयटी पार्क परिसरात एका बांधकाम साइटवर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास बांधकामावरील क्रेन कोसळल्याने एक मजूर ठार झाला असून, तीनजण जखमी झाले. रवींद्रकुमार दुर्याेधन प्रधान (वय २३, रा. लेबर कॅम्प माण, मूळ गाव ओरिसा) असे क्रेनसह चौदाव्या मजल्यावरून मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
हिंजवडीत सिरोया एफएम इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड या कन्स्ट्रक्शन कंपनीचे गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. बाळू घोडके, दत्ता व देवमुंडा कमल (रा. लेबर कॅम्प) या तिघांचा जखमींमध्ये समावेश आहे, अशी माहिती
चतु:शृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने यांनी दिली. (वार्ताहर)