हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी

By Admin | Updated: April 29, 2017 04:11 IST2017-04-29T04:11:16+5:302017-04-29T04:11:16+5:30

देहूगाव-देहूरोड रस्त्यावरील नायडूनगर भागातील संत तुकाराम पादुकाजवळ मोटारीला दुचाकी आडवी घालून अज्ञात हल्लेखोरांनी पती-पत्नीवर तलवार

The couple was seriously injured in the attack | हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी

हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी

देहूगाव : देहूगाव-देहूरोड रस्त्यावरील नायडूनगर भागातील संत तुकाराम पादुकाजवळ मोटारीला दुचाकी आडवी घालून अज्ञात हल्लेखोरांनी पती-पत्नीवर तलवार व काठ्यांनी हल्ला करून जखमी केले. हल्ल्यात पती जबर जखमी झाला असून, पत्नीच्या हाताची चार बोटे तुटली आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.
महेंद्र शंकर काळोखे (वय ३१) व राणी महेंद्र काळोखे (वय २५, रा. समर्थनगर माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
मध्यरात्री काळोखे दाम्पत्य घरी जात असताना देहू-देहूरोड रस्त्यावर त्यांच्या मोटारीला दुचाकी आडवी घालण्यात आली. त्या दुचाकीवरील एकाने महेंद्र यांना डेंगळ्या कुठे आहे असे विचारले. त्यावर तुम्ही माझी गाडी का अडविली? असे विचारले. त्यानंतर दुचाकीवरील हल्लेखोरांनी हुज्जत घातली. त्या वेळी मागून आलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील इसमांनीही त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पहिल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांच्याकडील तलवारीने महेंद्र यांच्या डोक्यात व डाव्या हातावर व पायावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: The couple was seriously injured in the attack