नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड
By Admin | Updated: October 14, 2016 05:40 IST2016-10-14T05:40:53+5:302016-10-14T05:40:53+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या आकुर्डी, काळभोरनगर येथील संपर्क कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली

नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या आकुर्डी, काळभोरनगर येथील संपर्क कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने हल्लेखोर कोण, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
नगरसेविका काळभोर यांचे संपर्क कार्यालय काळभोरनगर भागात आहे. सकाळी ११च्या सुमारास आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने कार्यालयाच्या काचा फोडल्या. कार्यालयातील खुर्च्या तोडल्या. हल्लेखोरांचा हल्ला करण्यामागील हेतू काय असावा याचा आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नागरिकांची वाहने जाळण्याचे प्रकार शहरात विविध भागात घडत असताना, भरदिवसा नगरसेवकांची कार्यालयेसुद्धा फोडली जात
असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)