शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Coronavirus Pimpri : भयाण वास्तव! पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयामध्ये नाही एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 1:50 PM

दहा दिवसांत महापालिका रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या ३८० खाटा उपलब्ध होणार

पिंपरी : कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रूग्णांना आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरच्या खाटांमध्ये वाढ केली जाणार आहे. पुढील दहा दिवसांत जम्बो हॉस्पिटल, आॅटो क्लस्टर आणि महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या ३८० खाटा उपलब्ध होणार आहेत. शहरात महापालिका रूग्णालयात एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही, खासगी रुग्णालयात चार खाटा उपलब्ध आहेत, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

महापालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये सध्यस्तीतीत  ७४ खाटा असून त्यात वाढ करून २९० खाटांची उपलब्धता केली जाणार आहे. शहरातील कंपन्या सीएसआरअंतर्गत ९० खाटा देणार आहेत. पुढील दहा दिवसांत जम्बो हॉस्पिटल, आॅटो क्लस्टर आणि महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या ३८० खाटा उपलब्ध होणार आहेत. तसेच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या २० हजार रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आजपासून कॉल सेंटर सेवा  सुरू झाली आहे. याबाबतची माहिती प्रवक्ते शिरीष पोरेडी, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी   दिली.................पोरेडी म्हणाले, नेहरूनगर येथील जम्बो हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर खाटांची संख्या ६०  होती. त्यात ४० खाटा वाढविल्या जाणार असून अशा १०० खाटा उपलब्ध होतील. आॅटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या १४ होती. त्यात १६  ने वाढ करून खाटांची संख्या ३० वर नेली जाणार आहे...................सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘थेरगाव, जिजामाता, आकुर्डी आणि भोसरी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ४० याप्रमाणे  व्हेंटिलेटरच्या खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्यात आहे. त्याचबरोबर शहरातील विविध कंपन्या सीएसआरअंतर्गत महापालिकेला व्हेंटिलेटरच्या ९० खाटा देणार आहेत. पुढील दहा दिवसांत व्हेंटिलेटरच्या ३८०  खाटा उपलब्ध होणार आहेत.’’................................एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाहीमहापालिकेची दहा कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तिथे सौम्य लक्षणे असलेल्या  रुग्णांवर उपचार केले जातात.  दहा सेंटरमध्ये २ हजार १८ खाटा आहेत. त्यातील १७३२ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. १८६ खाटा शिल्लक आहेत. महापालिका रुग्णालयात आज एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयात चार खाटा उपलब्ध आहेत.

.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तAjit Pawarअजित पवारMayorमहापौर