शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे पिंपरी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'बायोमेट्रिक थम्ब'पासून सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 3:51 PM

कोरोना हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालयात उपाययोजना

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या वेळेत करावयाची स्वाक्षरी

पिंपरी : कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ' बायोमेट्रीक थम्ब ' इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ही सवलत दिली आहे, याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.  चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. त्यानंतर पुणे शहरात शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील पाच जण संशयित रुग्णांपैकी तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये त्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कोरोना हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालयात उपाययोजना केल्या जात आहे.बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. जेथे थम्ब मशीन कार्यान्वित आहे. तेथील महापालिका कर्मचा-यांना  ३१ मार्चपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या वेळेत स्वाक्षरी करावयाची आहे. सर्व आहारण-वितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली हजेरी पत्रकाची नियमितपणे तपासणी करावयाची आहे. फिरतीचे कामकाज असलेल्या कर्मचाऱ्यांनी फिरती रजिस्टिरला नोंदी कराव्यात. त्याची तपासणी आहारण-वितरण अधिकारी, विभागप्रमुखांनी करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरEmployeeकर्मचारी