Coronavirus Pimpri : पिंपरीत जम्बो आणि ऑटो क्लस्टर रुग्णालययांसाठी टँकरमधून २२ टन ऑक्सिजन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 22:04 IST2021-04-21T22:00:38+5:302021-04-21T22:04:48+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या २ दिवसापासून जाणवत होता.

Coronavirus Pimpri : पिंपरीत जम्बो आणि ऑटो क्लस्टर रुग्णालययांसाठी टँकरमधून २२ टन ऑक्सिजन उपलब्ध
पिंपरी : कोरोना काळात हॉस्पिटलमधील ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी प्रयत्न केले जात असून महापालिकेची रुग्णालये जम्बो कोविड, ऑटो क्लस्टर रुग्णालयांसाठी २२ टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे, अशी माहिती उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या २ दिवसापासून जाणवत होता. मात्र, कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजन संपला नव्हता. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आढावा घेतला. ऑक्सिजन समन्वयक स्मिता झगडे यांना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी समन्वय साधायला सांगितला होता. सहानी, आयनॉक्स व एअर लिक्कीड यांचेमार्फत काल रात्री तीन टँकरद्वारे सुमारे २२ टन आॅक्सिजन उपलब्ध करून घेतला आहे.
नेहरूनगरातील जम्बो कोविड, ऑटो क्लस्टर, आणि भोसरी गवळी माथा इतर ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरला ऑक्ससिजन साठा वाटप केले आहे.
उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, ‘‘अन्न व औषध प्रशासन सोबत समन्वय ठेवून ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन घेण्याचे काम सुरू आहे. तसेच ऑजन पुरवठ्यासंबंधी आलेले सर्व फोन कॉल स्विकारून संबंधित खासगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर उपलब्ध करून दिलेले जात आहेत. ऑक्सिजन नाही म्हणून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही.’’