शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

coronavirus: पुणे विभागातील ३ लाखांहून अधिक उद्योग सुरू, बहुतांश कंपन्यांचे ३० ते ७० टक्के क्षमतेने काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 05:37 IST

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या पुणे विभागामध्ये लघु, सूक्ष्म, मध्यम (एमएसएमई), सेवा उद्योग आणि मोठे उत्पादन उद्योग मिळून ३ लाख ६५ हजारांहून अधिक उद्योगधंदे आहेत.

- विशाल शिर्केपिंपरी : लॉकडाऊनचे (टाळेबंदी) नियम शिथिल केल्यानंतर उद्योगांचा गाडा पूर्वपदावर येत आहे. पुणे विभागातील साडेतीन लाखांहून अधिक उत्पादन आणि सेवा उद्योगांपैकी तीन लाखांहून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. मागणी बेताची असल्याने बहुतांशउद्योगधंदे तीस ते ७० टक्के क्षमतेने सुरू आहेत.पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या पुणे विभागामध्ये लघु, सूक्ष्म, मध्यम (एमएसएमई), सेवा उद्योग आणि मोठे उत्पादन उद्योग मिळून ३ लाख ६५ हजारांहून अधिक उद्योगधंदे आहेत. त्यातील ६० टक्के उद्योग सेवा क्षेत्रातील आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात एमएसएमई क्षेत्रातील २ लाख ३४ हजार उद्योग असून, मोठे उद्योग समूहांची संख्या ८३२ इतकी आहे. आॅटोमोबाईल, फोर्जिंग, इलेक्ट्रॉनिक, कृषी प्रक्रिया अशा उद्योगांचा समावेश आहे.सुरुवातीच्या काळात कच्च्या मालाचा तुटवडा होता. तो देखील पूर्वपदावर येत आहे. माघारी गेलेल्या मजुरांपैकी २५ हजार मजूर परत आले आहेत. रोजंदारी, कॉन्ट्रॅक्टवरील आणि मालाची चढ-उतार करणाऱ्या मजुरांचा वानवा आहे.विभागातील सर्व मोठ्या कंपन्या सुरू झालेल्या आहे. झेरॉक्स अथवा तत्सम सेवा क्षेत्रातील लहान व्यवसाय-उद्योग अजून पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. मागणी बेताची असल्याने तेथील कामकाज ३० ते ७० टक्के सुरू आहे. बजाजसारख्या कंपन्यांना बाहेरील देशातून मोठी मागणी असल्याने तेथील कामकाज तीनही शिफ्टमधे सुरू आहे. १६०० पैकी पंधराशे कर्मचारी कामावर येत आहेत. केवळ,कंटेन्मेंट झोनमधील कर्मचारी हजर राहू शकले नाहीत. - सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग विभाग

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायPuneपुणे