शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी ; कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३१ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 20:26 IST

पिंपरी चिंचवडमध्ये काेराेनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील काेराेनामुळेचा हा पहिला मृत्यू आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून आज दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. कोरोनामुळे रविवारी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३१ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे गेल्या महिनाभरात पहिला मृत्यू शहरात झाला आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. तर १ एप्रिलपासून १९ रूग्णांची वाढ झाली आहे. ११ मार्चला शहरात पहिले तीन रूग्ण सापडले होते. त्यानंतर मार्च अखेरपर्यत १२ रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर १ एप्रिलपासून दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक आणि त्यांच्या सहवासात आलेल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. पुण्यातील एनआयव्हीमध्ये शनिवारी २९ जणांचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी  पाठविले होते. त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ३१ असून त्यातील तीन रूग्ण पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून उर्वरित रूग्ण पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह रूग्णात  दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक आणि त्यांच्या सहवासात आलेल्यांचा समावेश अधिक आहे.

महापालिका रूग्णालयात आज ६५ जणांना दाखल करण्यात आले असून पुण्यातील एनआयव्हीमध्ये त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तर आजपर्यंत रूग्णालयात एकुण ८० रूग्ण दाखल केले असून आज २७ रूग्णांना घरी सोडले आहे.

कोरोनाचा पहिला बळीराज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सुरूवातीला सर्वाधिक रूग्ण आढळले होते. मात्र, मार्च अखेरपर्यंत १२ ही रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर एक एप्रिलपासून रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या महिनाभरात एकही मृत्यू झाला नव्हता. रविवारी एका पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. संबंधित व्यक्ती ही ४५ वर्षांची असून तीला चार दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल केले होते. त्याचा आज मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड