शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पिंपरी चिंचवडमधील ९० संशयित रुग्णांना डिस्चार्ज; शहरात पॉझिटिव्ह रुग्ण १२

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 15:01 IST

गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

ठळक मुद्दे एकूण १०५ रुग्णांची केली तपासणी; तीन जणांचे अहवाल प्रलंबित

 पिंपरी :  कोरोनाशी दोन हात करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय विभाग अहोरात्र झटत आहे. नऊ दिवसांत एकूण १०५ दाखल रुग्णांपैकी ९० जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज केले आहे. आज दाखल केलेल्या तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.  पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. दक्षता म्हणून शहरातील आणखी दोन रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातून आजपर्यंत एकूण १०८  व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ९० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ९० जणांना घरी सोडण्यात आले आहेत. उपचारार्थ दाखल पंधरा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. शुक्रवारी तीन रुग्ण रुग्णालयात दाखल केले असून, या व्यक्तींचा कोरोनाकरिता घश्यातील द्राव्याचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.हर्डीकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णालये आणि वैद्यकीय विभाग सज्ज आहे. परंतु नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. आज तीन नवीन संशयित दाखल झाले असले तरी सोळा जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या रुग्णालयात पंधरा जण उपचार घेत आहेत. तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहे. तसेच होम क्वारंटाईनची केलेल्या नागरिकांची संख्या सहाशे तेरा आहे. तर चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २९ आहे.’’ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर