शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या उत्पनावर कोरोनाचा परिणाम; दुकाने सुरु,करसंकलन अद्याप बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 12:18 IST

 मालमत्ता कर महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे; परंतु याकडे करसंकलन विभागाचे दुर्लक्ष

ठळक मुद्दे राज्य सरकारकडून जीएसटीपोटी मिळणारा महसूल झाला कमीमहापालिकेने १० मे रोजी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा केली सुरू

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याने महापालिकेने शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे साधन असणारी करसंकलन अद्याप बंदच आहेत. यामुळे महापालिकेला मिळणारा महसुलावर परिणाम झाला आहे.लॉकडाऊनचा परिणाम महापालिकेच्या अर्थकारणावर झाला आहे. राज्य सरकारकडून जीएसटीपोटी मिळणारा महसूल कमी झाला आहे. एप्रिल महिन्यात केवळ ५० कोटी रुपयेच महापालिकेला मिळाले आहेत. भविष्यातही पैसे कमी मिळण्याची शक्यता आहे.  मालमत्ता कर महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे; परंतु याकडे करसंकलन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटत आले आहेत. महापालिकेने १० मे रोजी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यातच १६ विभागीय करसंकलन कार्यालये बंदच आहेत. त्यामुळे ज्यांना कराचा भरणा करायचा आहे, त्यांना करभरणा करता येत नाही. चालू आर्थिक वर्षातील दोन महिने संपत आले आहेत.  त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेने कोरोनाची काळजी घेण्याच्या सूचना करत शहरातील विविध दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, विभागीय करसंकलन कार्यालये बंदच आहेत. केवळ ऑनलाइन करभरणा सुरू आहे. 

सवलत योजनांना मुदतवाढ- महापालिकेने चालू आर्थिक वर्षात ३१ मे २०२० अखेर थकबाकीसह संपूर्ण मालमत्ता कर एकरकमी १०० टक्के भरल्यास भरणा दिनांकापर्यंत आकारलेल्या महापालिका कराच्या विलंब दंड रक्कमेत ९० टक्के सवलत जाहीर केली. आॅनलाइन कर भरण्याचे काम प्रत्यक्षात १० मेपासून सुरू झाले आहे.

..........................

- विभागीय कार्यालयेही बंदच आहेत. नागरिकांना केवळ २० दिवसच मिळत आहेत. त्यामुळे सवलत योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. याशिवाय १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत  कर भरणाऱ्या सामान्य करात सवलत योजना आहे. तसेच ज्या माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी, फक्त महिलांच्या नावे असलेल्या, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या , कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावरील मालमत्तांना सवलत दिली जाते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTaxकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर