शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Vaccine : पिंपरी शहरातील लसीकरणाचा वेग मंदावला; बुधवारपर्यंत ९४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली लस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 11:26 IST

आरोग्य कर्मचारी लसी घेण्यासाठी पाठ फिरवत असल्याचे आकडेवारीवरून समोर

ठळक मुद्देआठ केंद्रे मि‌ळून बुधवारपर्यंत झाले ९४७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पिंपरी : शहरात १६ जानेवारीला उत्सवी वातावरणात कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी शहरातील आठही केंद्रांवर उत्साह दिसून आला. मात्र, आता आरोग्य कर्मचारी लसी घेण्यासाठी पाठ फिरवत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

पहिल्या दिवशी (शनिवारी) ४५६ जणांनी लस घेतली. मंगळवारी २७८, बुधवारी २१३ जणांनी लस घेतली यावरून लसीकरणाचा टक्का घसरत असल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या दिवशी नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यादिवशी ७१ कर्मचाऱ्यांनी नवीन जिजामाता रुग्णालयात लस टोचून घेतली. त्यादिवशी सर्वाधिक लसीकरण हे जिजामाता रुग्णालयात झाले होते. त्यानंतर दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मंग‌ळवारी जिजामाता रुग्णालयात अवघ्या ६ जणांनी लस टोचून घेतली. बुधवारी १५ जणांनी येथे लस टोचून घेतली. यावरून पहिल्या दिवशी दिसलेला उत्साह आता दिसून येत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने लसीकरणासाठी शहरात आठ केंद्रे सुरू केले आहेत. प्रत्येक केंद्रावर दिवसाला १०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. म्हणजे दिवसाला ८०० जणांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे.नागरिकांमध्ये लसीबाबत कोणताही भीती राहू नये, म्हणून सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. लसीबाबत वेगवेग‌‌ळ्या प्रकारच्या अफवा सध्या पसरत आहे. त्याचा परिणाम हा लसीकरणावर होत आहे. त्यामुळे अफवा थांबवून, लसीबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.----

बुधवारपर्यंत झालेले लसीकरण

यमुनानगर रुग्णालय - १२९नवीन जिजामाता रुग्णालय - ९२नवीन भोसरी रुग्णालय - १३३

वायसीएम रुग्णालय - १५३

पिंप‌ळे निलख रुग्णालय - १२५कासारवाडी दवाखाना - १०४तालेरा रुग्णालय -            ११९

ईएसआयएस रुग्णालय -   ९२

                                    एकूण ९४७---शनिवारी ४५६, मंग‌ळवारी २७८, बुधवारी २१३

---

लसीकरण कमी होण्याची कारणेलसीची सुरक्षितता, परिणामकारतेबाबत साशंकता.कोविन ॲपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या लाभार्थींच्या यादीतील त्रुटी.

लसीबाबत पसर असलेल्या अफवा.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने भीती झाली कमी.रुग्णसंख्येबरोबर मृत्यूदर कमी झाला.आरोग्यसेवेत काम करूनही अनेकांना कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे लस घ्यायची की नाही, याबाबत असलेली शंका.

इतर आजार असल्याने काही जण राहिले अनुपस्थित.

--वायसीएमला सर्वाधिक लसीकरण

बुधवार २० जानेवारीपर्यंत शहरातील आठ केंद्रांपैकी सर्वाधिक लसीकरण हे वायसीएम रुग्णालयात झाले आहे. या केंद्रावर १५३ जणांनी लस घेतली आहे. नवीन जिजामाता रुग्णालय आणि ईएसआयएस रुग्णालय या दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी ९२ जणांनी लस घेतली आहे. या दोन्ही केद्रांवर झालेले हे लसीकरण हे इतर केंद्रांच्या तुलनेने कमी आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल