शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत कोरोना तपासणी अहवालासाठी लागतोय वेळ; रूग्णांच्या उपचारासाठी विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 19:09 IST

पुण्यातील प्रयोगशाळेत कोरोना संशयित रुग्णांचे घेतलेले घशातील द्रावाचे नमुने पाठविले असता दोन-दोन दिवस त्याचा अहवाल मिळत नाही.  

ठळक मुद्देशहरासाठी एनआयव्हीच्या प्रमाणे स्वतंत्र लॅब तत्काळ सुरु करण्याची गरज

पिंपरी : कोरोना संशयित रुग्णांचे घेतलेले घशातील द्रावाचे नमुने पुणे शहरातील प्रयोगशाळेत पाठविले असता दोन-दोन दिवस त्याचा अहवाल मिळत नाही.  पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास सध्याच्या प्रयोगशाळेची क्षमता कमी पडणार आहे. त्यामुळे शहरात स्वतंत्र लॅब असावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे रूग्णांच्या उपचारासाठी वेळ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातून रोज किमान शंभर संशयितांचे नमुने पुणे येथील नॅशनलय व्हायरॅलॅजी (एनईआयव्ही) मध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचा रिपोर्ट १२ तासात मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ४ तास नव्हे तर ४८ तासात सुध्दा अहवाल मिळत नाही. परिणामी पुढील उपचार अशक्य असतात. रुग्ण आणि डॅक्टरसुध्दा त्रस्त आहे. पिंपरी चिंचवड शहर २७ लाख लोकसंख्येचे आहे. या शहरासाठी एनआयव्हीच्या प्रमाणे स्वतंत्र लॅब तत्काळ सुरु करण्याची गरज आहे.पुणे शहरातील रुग्णांची संख्या रोज १५० ने वाढतेच आहे. तिकडे रोज संशयीतांची यादी मोठी आहे. परिणामी त्यांचे नमुने प्रथम घेतले जातात. आता पुणे शहरातील रुग्णांची संख्या ३१ मे दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील कोरोना रुग्ण ३१ मे पर्यंत ९,६०० होतील असे एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे पुणे शहरातील रग्णांचे अहवाल अधिक आहेत, त्यामुळे  असताना पिंपरी चिंचवडचे नमुने तपासणीसाठी वेळ लागत आहे. या दिरंगाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कुचंबना होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड  शहरात स्वतंत्र प्रयोगशाळा तयार करण्याची गरज आहे. भोसरी येथील नारी (नॅशनल एड्स संशोधन केंद्र) संस्थेमध्ये काही नमुने तपासणीसाठी पाठवतात, पण त्यांच्याही मयार्दा आहेत. अशा परिस्थितीत तत्काळ स्वत:ची प्रयोगशाळा सुरू करण्याची गरज आहे.पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिकेने स्वतंत्र लॅब तत्काळ सुरू करावी, अशी मागणी भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी आज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर