शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीमध्ये एका दिवसात आढळले तेरा रूग्ण; कोरोनाचा सातवा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 13:44 IST

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ७९ असून, त्यातील १० रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

ठळक मुद्देशहरातील २१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून शहराचा नव्वद टक्के भाग मुक्त

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून, दिवसभरात १३ नवीन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरात उपचार घेत असलेली पुण्यातील शिवाजीनगरच्या महिलेचा कोरोनाने सातवा बळी घेतला आहे. नवीन रूग्णांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. शहरात पॉझिटिव्ह सक्रिय रूग्णांची संख्या ७९ गेली आहे. आजपर्यंत १४५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.पिंंपरी-चिंंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पुण्यापेक्षा पिंपरीत कोरोनाचा वेग काहीसा कमी आहे. शहरातील २१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून शहराचा नव्वद टक्के भाग मुक्त झाला आहे. केवळ दहा टक्के क्षेत्रात कंटन्मेंट झोन आहे.शहरातील २०५ रूग्णांना रूग्णालयात मंगळवारी दाखल केले होते. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल बुधवारी सकाळी आले असून,  त्यात दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दहा पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. शहरातील ६० रुग्ण कोरोनामुक्त...पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ७९ असून, त्यातील १० रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमधील परंतु, शहराबाहेरील रूग्णालयात आठजण उपचार घेत आहे. महापालिका परिसरातील रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे. तसेच शहरातील ६० आणि पुण्यातील दोन असे एकुण ६२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना बळीमध्ये पुण्याचे चारबुधवारी पॉझिटिव्ह आलेले अकरा रूग्ण शहरातील असून, मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड येथील रहिवाशी आहेत. तर दोन रूग्ण पुण्यातील आहेत. पुरूषांमध्ये एकाचे वय ६ वर्षे दुसºयाचे वय २१, तिसºयाचे वय २२, चौथ्याचे वय २४, पाचव्याचे वय २८ वर्ष, सहाव्याचे ३०, सातव्याचे ५० वर्ष, आठव्याचे वय ३३, नवव्याचे वय ३३, दहाव्या व्यक्तीचे वय ५२ वर्ष आहे. तर महिलांमध्ये एकीचे वय २५, दुसरीचे वय २८ वर्षे आहे. शिवाजीनगर येथील एक महिला पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेत होती. तिचा मृत्यू बुधवारी झाला आहे. तसेच येरवडा येथील आणि पिंपरीत उपचार घेणा?्या पुरुषाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. कोरोनामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील चार अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरNavalkishor Ramनवलकिशोर राम