शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तासांत सहा रूग्ण; एकुण संख्या २७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 20:19 IST

मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शुक्रवारी ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी

ठळक मुद्देशुक्रवारी ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा  घट्ट होत असून शुक्रवारी तीन रूग्ण आढळून आले आहेत.  चोविस तासात शहरात सहा रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या २७ वर गेली आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. गुरूवारी एक पुरूष आणि एक महिला असे रूग्ण वाढले होते. त्यानंतर चोविस तासातच शुक्रवारी सायंकाळपर्यंत आणखी तीन रूग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज मिळाले आहेत. त्यात तीन जणांचा समावेश आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश आहे. पुरूष हा ५५ वर्षांचा तर महिला ४५ वर्षांची आहे.  आज रूग्णालयात ७४ जणांना दाखल केले आहे. तसेच ५४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. चोविस तासात रूग्णांची संख्या सहाने वाढली आहे. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या २७ झाली आहे.  तर एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आज ३४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.  कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही......................................मरकज कार्यक्रमातील नागरिकांवर लक्षपिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढण्यास दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या नागरिकांच्या सहवासात आलेल्यांचाही महापालिका प्रशासन शोध घेत आहे. गेल्या आठवडा भरात दाखल झालेल्या एकुण पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये मरकज कार्यक्रमातील सहभागी झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सहवासात आलेल्या नागरिक  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीhospitalहॉस्पिटल